पोलीस / सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
बार्टी व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प,योजना राबविल्या जातात. तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतीकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस / सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर योजनेचा सविस्तर तपशील, शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इ. बाबतच्या अधिक माहितीकरिता या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ http://barti.maharashtra.gov.in ला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावेत. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामाजिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व सीईटीमधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजाणी समिती यांचेकडे राहतील.