Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी! लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

0

भारतरत्न गानसम्राज्ञी कु.लता मंगेशकर यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून, या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (सन 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले.