Take a fresh look at your lifestyle.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याचे आवाहन

0

सामाजिकन्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कार्यरत राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतीगृह, कांदिवली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. ऑनलाइन भरलेला अर्ज पोर्टलवरून डाउनलोड करून प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह वसतीगृहात किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालयात ऑफलाइनरित्या सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतीगृह, ठाकूर कॉम्प्लेक्स,व्हिडीओकॉन टॉवरच्या समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ या ठिकाणी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.