घरबसल्या करा रेशन कार्डची ई-केवायसी; जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (ई-केवायसी) करण्यासाठी मेरा ई-केवायसी मोबाइल अॅप (Mera E-KYC App) आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअर वर “Mera E-KYC” सर्च करून हे अॅप डाऊनलोड करावे.
डाउनलोड झाल्यानंतर कोणता एर्रोर प्रॉब्लेम येईल त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अजून एक अॅप असणे गरजेचे आहे ते म्हणजे “आधार फेस आरडी सेवा अॅप” Aadhaar FaceRD हे अॅप डाउनलोड करून ठेवायचे आहे.
आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअर वर “Aadhaar FaceRD” सर्च करून हे ॲप डाऊनलोड करावे पुन्हा मेरा ई-केवायसी मोबाइल अॅप ओपन करायचे आहे.
मेरा ई-केवायसी अॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपले राज्य निवडून Verify Location वर क्लिक करा.
पुढे आपला आधार क्रमांक टाकून Generate OTP वर क्लिक करा, त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा. माहिती सत्यापित करून सबमिट करा.
“फेस ई-केवायसी” पर्यायावर क्लिक करा आणि सेल्फी कॅमेरा सुरू झाल्यावर डोळे बंद-उघडा. चेहरा स्कॅन होताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. यशस्वी ई-केवायसी नंतर मेसेज मिळेल आणि खात्री करता येईल. ई- केवायसी न केल्यास शिधापत्रिका सुविधांवर परिणाम होऊ शकतो. तसेच काही अडचण असल्यास: आपल्या रास्तभाव दुकान किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा.
वेळेत ई-केवायसी करून तुमच्या धान्य हक्काची खात्री करा !
संपर्क: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967, ई-मेल: helpline.mhpds@gov.in