अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत GR
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
२. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून, २०२५ या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक – १ मधील प्रधान लेखाशीर्ष / उपशीर्ष /उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक – २ मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक-४ मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये २१८.०० कोटी एवढा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.