लक्ष्मी मुक्ती योजना…
लक्ष्मी मुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची एक विशेष योजना आहे, ज्याअंतर्गत पती आपल्या नावावर असलेल्या शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवू शकतो. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना शेतीमालकीत भागीदार बनवणे आणि त्यांना मालमत्तेवरचा हक्क बहाल करणे.
लक्ष्मी मुक्ती योजनेतून स्त्रियांना शेतीच्या नोंदणीकृत मालकीमध्ये थेट सहभाग मिळतो. हे केवळ कागदोपत्री नसून भविष्यातील शेतीच्या व्यवहारांमध्ये, कर्ज प्रक्रियेत, अनुदानाच्या योजनेत किंवा मालमत्तेच्या अधिकारांमध्ये सहभाग निर्णायक भारतासारख्या कृषीप्रधान देशात महिलांचा शेतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दुर्दैवाने त्यांचा मालमत्तेवर फारसा हक्क राहत नाही. हाच सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेला विशेष स्थान दिले आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पतीने खालीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
1. अर्ज सादर करणे – पतीने आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन पत्नीचे नाव सहहक्कदार म्हणून नोंदवण्यासाठी अर्ज सादर करावा.
2. आवश्यक कागदपत्रे – अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
• विवाह प्रमाणपत्र (लग्नाची नोंद )
• 7/12 उताऱ्याची सध्याची प्रत
• आधार कार्ड / ओळखपत्र
ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी हे अधिकारी लक्ष्मी मुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात.
तलाठी कार्यालयाकडेच अर्ज प्रक्रिया केली जाते, त्यामुळे अर्जदारांनी थेट तलाठ्यांशी संपर्क साधावा.