Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठांसाठी आधारवड – एल्डर लाईन १४५६७

0

“घरात आम्ही दोघं एकटेच…”, “मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाइकांनी घर बळकावलंय…”

महाराष्ट्रातील अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा आता एल्डर लाईन १४५६७ या राष्ट्रीय हेल्पलाइनवर समजून घेतल्या जात आहेत.

मोफत सेवा – विश्वासाचा हात:

– माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, वृद्धाश्रम याबाबत मार्गदर्शन

– कायदेशीर मदत: मालमत्ता विवाद, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक कल्याण अधिनियम २००७ अंतर्गत सल्ला

– भावनिक आधार: मानसिक ताण, एकटेपणा, रागावर समुपदेशन

– पुनर्वसन: बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांना पुनर्वसन

महाराष्ट्रातील ४ लाखांहून अधिक कॉल्स, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मदत.

“एल्डर लाईन १४५६७” – ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा आधार, सुरक्षित जीवनाचा साथीदार!