Take a fresh look at your lifestyle.

निवृत्तीवेतनधारकांनो कोषागार कार्यालयाची महत्वाची सूचना…

0

निवृत्तीवेतनधारकांनो, सावध राहा! कोणत्याही बनावट फोन, मेसेज, लिंक अथवा फॉर्मला बळी पडू नका!

राज्यातील कोणत्याही कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन संदर्भात

फोन,

मोबाईल मेसेज,

ऑनलाईन लिंक

या माध्यमातून कधीही थेट संपर्क केला जात नाही.निवृत्तीवेतन सुरू करणे, बंद करणे, फरक अदा करणे अथवा रक्कम वसूल करणे अशा बाबतीत कोषागार कार्यालय फक्त पत्राद्वारे अधिकृत पत्रव्यवहार करते.कोणताही कर्मचारी निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठवला जात नाही.

संचालनालय, लेखा व कोषागारे, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांकडून खालील आवाहन करण्यात येते:

फोन पे / गूगल पे / अन्य ऑनलाईन माध्यमातून पैसे भरण्यास सांगणाऱ्या मेसेजेसना प्रतिसाद देऊ नका.

व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियाद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू नका.

अशा फसव्या प्रयत्नांना बळी पडू नये!

कोणताही संशयास्पद फोन किंवा मेसेज आल्यास, तातडीने तुमच्या जवळच्या कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा.

आपली माहिती सुरक्षित ठेवा — सावध रहा, सुरक्षित रहा!