कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नोंदणी पात्रता निकष
१८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगार
मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
वयाचा पुरावा
रहिवासी पुरावा
ओळखपत्र पुरावा
पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/- कामगारांसाठी कल्याणकारी योजना
शैक्षणिक योजना
1. कामगारांच्या मुलांना 1 ली ते 10 वी साठी 2500 ते 5000 रुपये अनुदान.
2. इयत्ता दहावी, अकरावी, व बारावी मध्ये 50 टक्के गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये वार्षिक अनुदान.
3. बारावीनंतर प्रथम द्वितीय व तृतीय वर्षात असलेल्या मुलांना 20 हजार रुपये अर्थसाह्य मिळते.
4. वैद्यकीय तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी 100000 रुपये अर्थसाह्य मिळते.
5) अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 60000
आर्थिक योजना
1. नोंदीत कामगारांच्या विवाहासाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य.
2. कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघाती मृत्यू कोटी वारसाला नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
3. कामगारांना कायम अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये मदत मिळते.
4.नोंदीत कामगाराच्या कुटुंबातील लोकांना दोन लाख रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेअंतर्गत मिळतात.
आरोग्यासाठी योजना
1. कुटुंबातील गंभीर आजारासाठी उपचारासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत
2. लाभार्थी मजुरायची निधन झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये तातडीची मदत
3. नैसर्गिक परिस्थिती पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
4. नोंदीत कामगाराच्या पत्नीस एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षे पर्यंत एक लाख मुदत बंद ठेव.
अर्ज करण्याचे ठिकाण- कामगार कार्यालय संबंधित जिल्हा