Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा, दरमहा मिळणार ६१,५०० रुपये मानधन

0

राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा, या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ हा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. फडणवीस यांनी शनिवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून या कार्यक्रमाची घोषणा केली.

या उपक्रमाअंतर्गत राज्यातील ६० फेलोशिपचा कालावधी १२ महिने असून, आणि वयोमर्यादा २१ ते २६ वर्षे ठेवण्यात आहे. अर्ज प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लवकरच सुरू होईल. पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील किमान ६० टक्के गुणांसह पदवी, एक वर्षाचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतील. फेलोंना एकूण ६१ हजार ५०० रुपये प्रतिमहिना देण्यात येणार आहे.