घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तब्बल ‘इतकी’ लाख घरे बांधणार…
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात 20 लाख घरे उभारण्याचे उद्दीष्ट असून इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आतापर्यंतच्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट उद्दीष्ट महाराष्ट्राला प्राप्त झालं आहे.
त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. ही घरे सर्वांना परवडणारी असणार आहेत. शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 लाख 51 हजार घरांना एकाच दिवशी एकाच वेळी मंजुरी देण्याचे काम विभागाने केले असून 14 लाख 71 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मदत करण्यात येत असून जमीन खरेदीच्या लाभामध्येही 50 हजार रुपयांची वाढ करून ती 1 लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्राचा 500 लोकवस्तीचा निकष 250 लोकवस्तीपर्यंत करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.