Take a fresh look at your lifestyle.

ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही – १ जूनपासून लागू होणार ‘हा’ नवे नियम

0

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आरटीओत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे..

किती शुल्क लागणार 

लर्निंग लायसन्स : १५० रुपये

लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : ५० रुपये

ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : ३०० रुपये

ड्रायव्हिंग लायसन्स : २०० रुपये

लायसन्स नूतनीकरण :२०० रुपये

दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स : ५०० रुपये

नवे नियम

■ किमान १ एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी २ एकर)

■ ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा

■ प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्ण व पाच वर्षांचा अनुभव असावा

■ हलक्या वाहनांसाठी ४ आठवड्यात २९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी २१ तास प्रात्यक्षिक)

■ अवजड वाहनांसाठी ६ आठवड्यात ३१ तास प्रात्यक्षिक) ३९ तासांचे प्रशिक्षण (८ तास थेअरी)

‘हे’ नवे नियम लागू होणार

जुने वाहने बाद प्रदूषण करणारे सुमारे ९ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.

कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल | २५ हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.

सुलभ अर्ज प्रक्रिया लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.

कागदपत्रां साठी https://parivahan.gov.in/ या | संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.