रेशन कार्डच्या eKYC साठी मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रक्रिया
राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” ही दोन मोबाईल अॅप्स सुरू केली आहेत, ज्यामुळे नागरिकांना घरी बसूनच ई-केवायसी करणे शक्य होणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व रेशनकार्डधारकांना 30 मार्चच्या आत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ही प्रक्रिया आता मोबाईल अॅपच्या मदतीने घरबसल्या सहज पूर्ण करता येईल.