अपंग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांमध्ये पाच टक्के आरक्षण
आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गरजू अपंग विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे. आदिवासी विकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. आदिवासी विकास विभागातर्फे राज्यभरात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविण्यात येतात. ३ ऑगस्ट, २००४ च्या शासन निर्णयानुसार या वसतिगृहांमध्ये अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.