Take a fresh look at your lifestyle.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट

0

विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे . अशातच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सुनावणीला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली आहे.

कारण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, त्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी आहे.

मात्र, याप्रकरणी आता 4 मार्च 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुन्हा पक्षांना अधिक वाट पाहावी लागणार आहे.