Take a fresh look at your lifestyle.

एकल पालकांच्या मुलांना महिन्याला २२५०/- रुपये मिळणार; बालसंगोपन योजनेतून करा अर्ज

0

सोलापूर- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका इ स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात ५,८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे. खरोखर गरजू असणाऱ्यास लाभ दिला जातो. सध्या ५८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी दिली.

आवश्यक कागदपत्रे 

१) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज

२) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला

५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला

६) पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत /

नगरपालिका यांचा)

७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे

पासबुक

८) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल

तर मृत्यूचा अहवाल)

९) रेशनकार्ड झेरॉक्स.

१०) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६

फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले

असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो)

१०) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो