संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज गुगल मीटद्वारे संवाद
संजय गांधी निराधार योजना जळगाव ग्रामीण विभागात साधारणतः २५ हजार लाभार्थी लाभ घेत आहेत. या लाभार्थ्यांना अडचणी संदर्भात तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे वेळ वाया जातो. उन्हाळा सुरू होत असून ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात येण्यात त्रास होऊ नये महणून शासन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्याबाबत विचार सुरू होता.
आता संजय गांधी निराधार योजना विभाग (जळगाव ग्रामीण ) तहसील कार्यालयामार्फत २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० ते ४:३० नागरिकांशी गुगल मीटद्वारे संवाद साधला जाणार आहे. याद्वारे लाभार्थी यांच्या समस्या जाणून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थी यांना समस्या असतील त्यांनी https://calendar.app.google/
jjiGRRdLUzuBqKKr9 या लिंकद्वारे घरबसल्या गुगल मीटद्वारे प्रशासनाशी संवाद साधावा असे आवाहन तहसीलदार शीतल राजपूत यांनी केले आहे.