राज्यातील सरपंचांसाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय…
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या संदर्भातील अधिकृत आदेश – जीआर जारी करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील 27951 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार होते. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. अखेर वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात जानेवारी 2025 पासून पुढील कालावधीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 346,26,08,000 रुपयांच्या अनुदानाला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 19 महिन्यांच्या किमान वेतनाच्या थकबाकीला मंजुरी दिली आहे.