या योजनेतंर्गत लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद होणार…
ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडी हा लागवडी योग्य क्षेत्राकरिता बनविण्यात येत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले परंतू साताबारावर नोंद नाही अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत विहित प्रक्रिया पार पाडून ई-फेरफार प्रणालीव्दारे पोटखराब वर्ग अ क्षेत्र सातबारावर लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर केले जाईल.
या रूपातंरित क्षेत्रामुळे ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडीमध्ये दर्शविलेल्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये आपोआप वाढ होईल. तसेच भविष्यात होणारे जमीन हस्तांतरणाचे व्यवहार देखील फार्मर आयडीशी आपोआप लिंक होणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी बनवत असतांना आपले कोणत्याही प्रकारे सातबारावरील क्षेत्र कमी दाखविले जाणार नाही याची दक्षता घेवून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून तयार करून घ्यावा.
अद्ययावतीकरण चालू राहणार:- अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीमध्ये पोटखराब खालील लागवडीची जमीन अथवा 7/12 मधील अन्य बदल दर्शविण्याची प्रक्रिया व अद्ययावतीकरण निरंतरपणे चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून फार्मर आयडी तयार करून घ्यावा.