Take a fresh look at your lifestyle.

तलाठी कार्यालयातील विविध सुविधा आता ऑनलाईन…

0

नागरिकांना ई-हक्क प्रणालीद्वारे ११ प्रकारच्या फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाइनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ते लिखित स्वरूपात अर्ज तलाठ्यांकडे देतात. मात्र, अनेक दिवस त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकाला ती सुविधा उपलब्ध होत नाही. तसेच त्या अर्जाबाबत ऑनलाइन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितांवर कारवाई करता येत नाही.

ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार उपलब्ध करण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, त्याची जिल्ह्यात १०० टक्के अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले. दुसरीकडे, महसूल विभागाच्या वतीने ई-हक्क माध्यमातून केलेले अर्ज मंजूर करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

या सर्व सुविधा ऑनलाईन स्वरूपात सुरु केल्यामुळे अर्जदाराने केलेल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येक अधिकाऱ्यासह संबंधित अर्जदारालाही कळू शकेल. यातून कारभारात पारदर्शकता येणार आहे.