कृषी कर्ज मित्र योजना! जाणून घ्या सविस्तर माहिती…
1)कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट
शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करून देणे
याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे.
शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देणे.
सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्याची सुटका करणे. ही या योजनेची उद्दिष्ट आहेत.
2)कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात.
लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते.
कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे.
निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे.
या कर्जाच्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.
अशा इच्छूक आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून देणे आवश्यक आहे.
अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करून दिल्यास, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.
3)या योजनेसाठी प्रतिप्रकरण सेवाशुल्काचा दर
अल्प मुदतीचे कर्ज
प्रथमतः पीक कर्ज घेणारा
पहिल्यांदाच पीक कर्ज घेणारा शेतकरी असेल
त्याला प्रति प्रकरण सेवाशुल्क 150/- रुपये आकारला जातो.
मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारा
नवीन कर्ज प्रकरण असेल, तर त्यासाठी शेतकऱ्याला प्रति प्रकरण 250/- रुपये सेवा शुल्क आकारण्यात येते.
कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण करावयाचे असल्यास.
शेतकऱ्याला प्रति प्रकरण 200/- रुपये सेवाशुल्क भरावा लागेल.
4)कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करावी
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषीकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.