Take a fresh look at your lifestyle.

RBI ची सूचना – काळ्या शाईने चेक वर लिखाण केल्यास…

0

सोशल मीडियावर एक खोटी माहिती वेगाने पसरली आहे, ज्यात चेकवर काळ्या शाईचा वापर न करण्याची सूचना दिली जात आहे. या चुकीच्या दाव्याला रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) फेटाळले आहे. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या दाव्याला खोटं ठरवत, सुरक्षा आणि फसवणूक टाळण्यासाठी काळ्या शाईने लिहिलेले चेक नाकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय आहे:- सोशल मीडियावर काही युजर्सना असा दावा केला जात आहे की, आरबीआयने चेकवरील शाईचा रंग फक्त निळा किंवा हिरवा ठेवावा, आणि हलकं किंवा अस्पष्ट लिहिणं टाळा. हा दावा अजिबात सत्य नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

PIB ने काय स्पष्ट केले:- PIB ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की आरबीआयने चेकवर काळ्या शाईचा वापर बंद करण्यासाठी कोणतेही नियम लागू केलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेने चेकवर कोणताही विशिष्ट शाईचा रंग निश्चित केलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

आरबीआयचा नियम काय आहे:- रिझर्व्ह बँकाने स्पष्ट केले आहे की, सीटीएस प्रणाली अंतर्गत प्रत्येक चेकचे तीन फोटो घेतले जातात: फ्रंट ग्रे स्केल, फ्रंट ब्लॅक अँड व्हाइट, आणि बॅक ब्लॅक अँड व्हाइट. चेकवरील माहिती सुस्पष्ट आणि स्पष्ट असावी, म्हणून ग्राहकांना विविध रंगांच्या शाईचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी एकच रंग वापरण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, एखाद्या विशिष्ट रंगात शाई वापरण्याची सक्ती नाही.चेकवरील शाईचा रंग विषयक जो खोटा दावा पसरवला जात आहे, तो पूर्णपणे निराधार आहे.