Take a fresh look at your lifestyle.

आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’

0

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ च्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा मंत्रालयात हेलपाटे मारावे लागतात. यादरम्यान होणारा त्रास लक्षात घेऊन ही सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशांचा अपव्यय टळणार आहे.

जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा’ स प्राप्त अर्जांची सद्यःस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास साहाय्य करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच अर्थसाहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच उपचारांचा खर्च वाढत असल्यास अर्थसाहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मंत्रालयात येतात. यात वेळ आणि पैशांचा होणारा अपव्यय टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता निधी कक्ष स्थापन केले जाणार आहेत.

रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा’कडे मदतीचा अर्ज करण्याबरोबर, मदतीसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल. –रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

या उपचारासाठी मिळतो लाभ – महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोबाईल क्रमांक

८६५०५६७५६७