Take a fresh look at your lifestyle.

लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार ! ‘या’ तारखेला खात्यात खटाखट पैसे येणार….

0

▪️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात मिळणार आहे. हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता असून त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे.

▪️ नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला असून महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. त्यात राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे. कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

▪️ दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारीला मकरसंक्रात आहे. याच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागली आहे.