शासनाचा मोठा निर्णय! आता घरबसल्या करता येणार कागदपत्र नोंदणी….
नागरिकांना कागदपत्र नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागतात. मात्र आता फडणवीस सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.