Take a fresh look at your lifestyle.

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार…

0

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी. बी. टी. पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. क्षेत्रिय स्तरावरुन दिनांक १९.१२.२०२४ पर्यत DBT पोर्टलवर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २७,१५,७९६ इतकी आहे. त्यानुषंगाने DBT पोर्टलवर झालेल्या + Aadhar Validate न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच On Board नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पध्दतीने (बिम्स प्रणालीद्वारे) अर्थसहाय्य वितरीत करण्यात येणार आहे. वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी, २०२५ अखेरपर्यंतच

उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका / मंडळस्तरावर विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापुर्वी पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक १९.१२.२०२४ पर्यत On Board झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १२,३६,४२५ इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १४,७९, ३६६ इतकी असून अशा एकूण २७,१५,७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता

रु.४०८.१३ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहू योजनांकरीता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी. बी. टी. द्वारे करण्याबाबत महाआयटी कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करतील व सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे की, आपल्या जिल्हयातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डी. बी. टी. पोर्टलवर भरल्याची खातरजमा करावी.