Take a fresh look at your lifestyle.

शेतकर्‍यांनो, आता ‘DAP’ खताची पिशवी फक्त ‘इतक्या’ रुपयांना मिळणार…

0

▪️ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयानुसार, सरकारने ‘डीएपी’ खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी विशेष अनुदान पॅकेजला मंजुरी दिली आहे.

▪️ दुसर्‍या निर्णयानुसार, सरकारने पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. 3 हजार 850 कोटी रुपयांच्या विशेष अनुदान पॅकेजमुळे 50 किलोची ‘डीएपी’ खताची पिशवी 1,350 रुपयांना मिळणार आहे.

▪️ 1 जानेवारी 2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्यतिरिक्त डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या कालावधीसाठी 3 हजार 500 रुपये प्रतिमेट्रिक टन दराने ‘डीएपी’ खतपुरवठा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

▪️ सध्या खुल्या बाजारात खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खुल्या बाजारात ‘डीएपी’च्या एका पिशवीची किंमत 3 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष अनुदान पॅकेजमुळे ‘डीएपी’ खताची पिशवी शेतकर्‍यांना खुल्या बाजारातील भावापेक्षा निम्म्याहून कमी किमतीत मिळणार आहे.