Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील सुधारित बाबी…

0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच, वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यापैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय, दिनांक ६.१.२०१७ अन्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. स्वाधार योजनेंतर्गत शासकीय वसतीगृहात

प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी स्वाधार योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कमसंबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.