Take a fresh look at your lifestyle.

कामगारांनो, तुम्हाला प्राधान्याने मिळणार स्मार्ट रेशनकार्ड…

0

■ पुढील 100 दिवसांमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने करावयाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.स्थलांतरित मजुरांना अन्न धान्यवाटपामध्ये प्राधान्य;स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्याच्या सूचना. महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानात धान्य मिळणार.

■ आगामी वर्षात २५ लाख नवीन लाभार्थ्याचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन व त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना. मागील ६ महिन्यात एकदाही अन्न धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाची तपासणी करण्याचे निर्देश.

■ शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळण्याबरोबर १०० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्यात यावी; संगणकीकृत न झालेल्या १४ लाख लाभार्थ्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना. अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे.

■ लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी; वाहनांचे जिओ टॅगिंग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबविण्यावर भर. गरजू लाभार्थ्यांचा सण, उत्वस उत्साहात साजरा होण्यासाठी सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप; आनंदाचा शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्याच्या सूचना.