विद्यार्थ्यांनो, तुम्हाला गृहपाठ दिलाय? एकदा उपशिक्षक श्री. प्रवीण धनगर सरांची दिनदर्शिका बघा…
राज्यातील विद्यार्थांसाठी यांचा अनोखा उपक्रम
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, सौ.प.न.लुंकड कन्याशाळेला 75 वर्ष पूर्ण होत असून शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शारदोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील उपशिक्षक श्री.प्रवीण धनगर यांच्या संकल्पनेतून 365 दिवसांचे दिनविशेष असणारी शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.मा.श्री.सुशील अत्रे यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले. शालेय परिपाठ घेत असतांना वर्गातील विद्यार्थीनीं सुविचार, गोष्टी, कविता,म्हणी हे तोंडी सांगत परंतू दिनविशेष विद्यार्थीनींनी सांगता येत नव्हते महिन्यातले एक किंवा दोन एवढेच सांगता येत होते. या समस्येवर श्री.प्रवीण धनगर यांनी विचार करून विद्यार्थीनींनी महीनावार हे कसे देता येईल यासाठी शैक्षणिक दिनदर्शिका हा उपक्रम त्यांना सुचला व त्यांनी शैक्षणिक वर्ष जून ते मे असा क्रम ठरवून महिन्यानुसार 365 दिवसांचे दिनविशेष सदर दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
दिनविशेष संकलनाचे काम श्री.संजय पाटील यांनी केले आहे. त्यांचे 365 दिवसांचे दिनविशेष तोंडपाठ आहेत तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्मतारखाही महीना व तारखेनुसार त्यांच्या तोंडपाठ आहेत. मुलांची एकाग्रता कशी वाढवावी या विषयावर राज्यातील शाळांमध्ये ते व्याख्यान घेतात. त्यांना गुगल गुरू,महाराष्ट्र गुगल,चालता बोलता विकिपीडिया असेही म्हणतात. त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सदर दिनदर्शिके मध्ये श्री. प्रवीण धनगर सरांचे मराठी, हिंदी व इंग्रजी एकत्रित तुलनात्मक व्याकरण पुस्तक व ग्रंथालय आपल्या दारी हे पुस्तिका क्यू.आर. कोड स्वरूपात मोफत मिळणार आहे. या आधीही सरांनी विविध उपक्रम विद्यार्थांसाठी राबवलेले आहेत.
सदर दिनदर्शिकेसोबत विद्यार्थ्यांना तीन आँनलाईन कोर्स डॉ.श्री.संजय रहाटे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. गेट सेट गो वर्ड या वेबसाईट वर त्यांचे विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. सर मास्टर करिअर कोच असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना तायडे यांचे अभ्यासमाला मराठी व्याकरण यूट्यूब चैनल क्यू.आर.कोड स्वरूपात मोफत उपलब्ध आहे.
शालेय वयात विद्यार्थांनी दिनविशेष पाठांतर करावे व प्रत्येक दिवसाचे महत्त्व आत्मसात करावे तसेच विद्यार्थीनीना या उपक्रमाचा नक्की उपयोग होईल अशी भावना शिक्षण प्रसारक मंडळाच्या मान्यवरांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रकाशन कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. मा.श्री. सुशील अत्रे,सचीव श्री.अभिजित देशपांडे,श्री.एस.ए.कुलकर्णी, श्रीमती प्रतिमा अत्रे तसेच कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळातील श्री.प्रेमचंद ओसवाल,श्री.शरच्चंद्र छापेकर, श्री.महेद्र लुंकड,श्री.पंकज अत्रे. सौ.लता छापेकर,
सौ.पद्मजा अत्रे, सौ.मीरा गाडगीळ, सौ.रेवती शेंदुर्णीकर ,सौ. प्रिया देशपांडे,सौ.प्रतिभा देशकर,सौ.भारती ईसइ,सौ.रजनी पाठक उपस्थिती लाभली.
सदर दिनदर्शिकेचे छपाईचे काम संगम ग्राफिक्स चे श्री. योगेश पाटील यांनी केले. सदर उपक्रमास अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राजश्री शिंदीकर,उपमुख्याध्यापक श्री. अनिल सैंदाणे, पर्यवेक्षिका सौ.लीना कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रागिणी पुराणिक यांनी केले तसेच प्रस्तावना श्री.प्रवीण धनगर यांनी केली तर आभार वंदना वाणी यांनी मानले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य व उपस्थिती लाभली.
शैक्षणिक दिनदर्शिका वैशिष्ट्ये
1) शैक्षणिक वर्ष जून ते मे महीना अशी निर्मिती
2) मराठी सुविचार, नोबेल विजेते,महाराष्ट्र संत,भारत रत्न,भारतीय वैज्ञानिक, भारतीय सण,थोर कवी व लेखक,भारतीय खेळाडू, परमवीर पुरस्कार, भारतीय महान महिला, थोर समाजसुधारक, भारतीय पंतप्रधान व राष्ट्रपती यांचेही माहितीचे संकलन केले आहे.
3)तसेच प्रत्येक महिन्यात शैक्षणिक व सामाजिक जीवनचरित्र माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत क्यू.आर.कोड स्वरूपात उपलब्ध आहे.
4) ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना तायडे यांचे अभ्यासमाला मराठी व्याकरण यूट्यूब चॅनल क्यू. आर.कोड स्वरूपात उपलब्ध.
महाराष्ट्रातील सर्वच शाळांपर्यंत शैक्षणिक दिनदर्शिका पोहचवण्याचा मानस आहे. तसेच 365 दिनविशेष पैकी 100 जरी दिनविशेष विद्यार्थ्यांचे पाठांतर झाले तरी माझा उपक्रम यशस्वी झाला असे मी समजेल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात हिंदी व इंग्रजी भाषेत शैक्षणिक दिनदर्शिका निर्मिती चा माझा मानस असून याचा बहुभाषिक विद्यार्थ्यांना सुध्दा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे सांगितले.
श्री. प्रवीण हिरालाल धनगर
उपशिक्षक
प.न.लुंकड कन्याशाळा, जळगाव.