वृद्ध व्यक्ती, अंध, विधवा, अपंग यांना मिळणार ‘या’ योजनेतून आर्थिक हातभार…
राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, विधवा, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने विशेष सहाय्य योजना सुरू करण्यात आली. या मध्ये निराधारांना जगण्याचा आधार देणाऱ्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया.
अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस:- विधवा, अपंग, निराधार अनुदान विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा. तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
https://cscservices.mahaonline.gov.in महाऑनलाईन CSC ची वेबसाईट ओपन झाल्यावर युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.
विशेष सहाय्य योजनेच्या सुधारित अटी व निकष:– दि. ०३/०५/२०२१ रोजीच्या नवीन शासन निर्णयात नमूद केलेल्या आहेत. यामध्ये काही बाबी मा. लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन त्यानुषंगाने मा. मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) यांच्या दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या बैठकीत विशेष सहाय्य योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत सर्वकष विचार करून दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा केल्या आहेत.
विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, विधवा पेंशन योजना, आणि दिव्यांग पेंशन योजना ) अर्जदाराचे अर्ज तहसील/तलाठी/ग्रामपंचायत कार्यालयात ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.