लाडक्या बहीणीनो, आपला हप्ता न जमा झाल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर तक्रार करा…
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
दरम्यान महायुतीच्या सरकारने निवडणुकांच्या वेळी आश्वासन दिले होते की, महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील.
मात्र त्यानंतर प्रचंड बहुमताने महायुती सरकार हे पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. त्यामुळे आता यापुढे महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत.
अशातच हा योजनेचे आत्तापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. अशातच आता सहावा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
मात्र आता पुढचा हप्ता हा मकर संक्रातीच्या आसपास महिलांना मिळू शकतो असं देखील म्हटलं जातं आहे. परंतु, यासंदर्भात अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.
परंतु, जर संक्रातीच्या आधी सर्वांच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा झाला आणि तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही तर काळजी करण्याचे कारण नाही.
कारण महिला यासंदर्भात 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन तुमची तक्रार नोंदवू शकतात.