Take a fresh look at your lifestyle.

इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, बाल कामगार व असंघटीत कामगार यांच्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध योजनांची माहिती देणाऱ्या कॅम्पचे आयोजन

0

दिनांक ०६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो अनुयायी येत असतात. या दिवसाच्या निमित्ताने कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य (वांद्रे) कार्यालयाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, बाल कामगार व असंघटीत कामगार यांच्या विविध योजनांची माहिती (बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, आर्थिक मदत इत्यादी. बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती, ई श्रम नोंदणी, ) लोकांपर्यंत पोचाविण्याकरिता सन २०१७ पासून आयोजन करण्यात आलेले आहे आणि तेथे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यात येते. यावर्षीही सदर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या आयोजित केलेल्या आमच्या कार्यालयाच्या कॅम्पला अवश्य भेट द्या.

कार्यक्रमाचे स्थळ – स्टोल क्रमांक ३५६, चैत्यभूमी, शिवाजी पार्क,दादर 

 दिनांक-०६.१२.२०२४

 वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत.