राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय….
कामगार विभागाच्या वाचा- ३ येथील दिनांक २४ जुलै, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये, किमान वेतन अधिनियम, १९४८ मधील वेतनाचे किमान दर पुननिर्धारित करण्यात आले असून त्यानुसार दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीकरीता खालीलप्रमाणे परिमंडळनिहाय किमान वेतन दर लागू आहेत.
सबब स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा व संलग्न वसतिगृहे यांमधील सफाईगार, पहारेकरी व मदतनीस या पदांवरील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन वरील तक्त्यात दर्शविलेल्या “अकुशल” वर्गवारीच्या किमान वेतनापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित उपक्रम ज्या परिमंडळाच्या क्षेत्रामध्ये येतो, त्या परिमंडळातील कार्यालयांना अनुज्ञेय असलेल्या दरानुसार निश्चित करण्यात यावे. तसेच कामगार आयुक्त यांचेकडून
वर्षातून दोन वेळा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीकरीता महागाई भत्ता जाहिर केला जातो. त्यानुसार एकूण किमान वेतनाची (मूळ वेतन + महागाई भत्ता) वर्षातून दोनदा परिगणना करण्यात यावी.
२. तसेच दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा यांमधील एकत्रित वेतनावरील कर्मचाऱ्यांचे वेतन खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.
३. उपरोक्तशिवाय विभागाच्या दिनांक २२ जून, २०१५ अन्वये महिला व बाल विकास विभागाकडून या विभागाकडे हस्तांतरीत झालेल्या अनुदानित मतिमंद बालगृह संलग्न दिव्यांग शाळा / कर्मशाळांमधील एकत्रित वेतनावरील कर्मचाऱ्यांचे वेतनखालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.