Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील शाळामधील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसूती रजा १८० दिवसापर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय….

0

राज्य शासनाच्या महिला कर्मचा-यांसाठी प्रसूती रजेची मर्यादा १८० दिवसापर्यत वाढविण्याबाबत वित्त विभागाने दि. २४ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसूती रजा १८० दिवसापर्यंत खालील अटीस अधीन राहून मंजूर करण्यात यावी.

१) या सुविधेचा लाभ २ अपत्यापुरताच मर्यादित राहिल. प्रसूती रजा मंजूर करण्याच्या इतर शर्ती पूर्वीप्रमाणेच या पुढेही लागू राहतील.

२) या सुविधेचा लाभ दि २४/८/२००९ दिनांकापासून लागू राहिल.

३) महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मधील नियम १६ मधील पोट-नियम १४ (अ) व (ब) तसेच पोट नियम १५, १६ व १७ यांचे कसोशीने पालन करणे अत्यावश्यक आहे.

(४) महिला शिक्षण सेवकांना तसेच महिला शिक्षिकेतर कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करीत असताना प्रसूती रजा घ्यावी लागल्यास शिक्षण सेवक पदाचा कालावधी त्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे.

२. याबाबत शिक्षण संचालक, पुणे यांनी योग्य ते आदेश संबंधीतांना तात्काळ पारीत करावेत व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मध्ये योग्य ती सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा.

३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १७८ / व्यय-५ दि. ८/३/२०१० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.