Take a fresh look at your lifestyle.

निवडूकीला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी लागणार ‘AB’ फॉर्म म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

• केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभा किंवा लोकसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज करायचा असेल तर त्याची खासगी माहिती आणि तो कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी त्याला दोन स्वतंत्र फॉर्म भरावे लागतात.

• यातील पहिला फॉर्म हा A आणि दुसऱ्या फॉर्मला B असे संबोधले जाते. याला एकत्रित AB फॉर्म संबोधले जाते. AB फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजले जाते. त्यामुळे हा फॉर्म भरणे महत्वाचे समजले जाते.

• एबी फॉर्म भरला म्हणजे तो उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे शिक्कामोर्तब होते. पक्षाचे अधिकृत चिन्ह उमेदवारीमागे लागण्यासाठी उमेदवार AB फॉर्म भरतात.

• या फॉर्मवर पक्षाने तिकिट वाटपासाठी अधिकृत नेमणूक केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.

• हा फॉर्म भरणे म्हणजे त्या राजकीय पक्षाने फॉर्म भरणाऱ्या उमेदवारास त्यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचे तिकिट दिले आहे असा होतो. या फॉर्ममध्ये काही प्रतिज्ञापत्रकंही असतात.

फॉर्म A म्हणजे काय :- राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या उमेदवाराचे नाव ‘ए’ फॉर्मद्वारे सांगितले जाते. हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून दिला जातो. त्यावर पक्षाध्यक्ष, सचिवाची सही, पक्षाचा शिक्का आवश्यक. फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरीही आवश्यक असते. ‘फॉर्म ए’मध्ये उमेदवाराचे नाव, त्यांचे पक्षातील पद व चिन्ह यांची माहिती असते.

फॉर्म B म्हणजे काय :- या फॉर्ममध्ये अधिकाऱ्याला जो फॉर्म (पत्र) दिला जातो. त्याला फॉर्म ‘बी’ म्हणतात. उमेदवाराला पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले जावे, असे म्हटलेले असते. प्रथम प्राधान्य असलेल्यास छाननीत नाकारले गेले तर चिन्ह आणि उमेदवारी वाटपासाठी पर्यायी नावही याच फॉर्ममध्ये असते. उमेदवार आमच्या पक्षाचा सदस्य असल्याचे म्हटलेले असते.