Take a fresh look at your lifestyle.

शासकीय सेवेत असताना निधन झाल्यास अनुकंप नियुक्ती धोरणातील तरतूदींमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय जारी…

0

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा (सहानुभूती) म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार नियुक्ती देताना खालील बाबींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून आली.

अ) अनुकंपा योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास १ वर्षाच्या आत कुटुंबातील पात्र सदस्यांपैकी एका व्यक्तीला त्याने धारण केलेल्या अर्हतेनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करावा लागतो. गट-क वर्गासाठी अर्हता ही पदवी असल्यामुळे व अनुकंपाधारक प्रतिक्षासूचीवर नाव घेतेवेळी गट-क पदाची अर्हता धारण करीत नसल्यास त्यांना गट-ड पदासाठीच अर्ज करावा लागतो. प्रत्यक्षात गट-ड च्या प्रतिक्षासूचीतून नोकरी मिळेपर्यंत काही अनुकंपाधारक गट-क ची अर्हता धारण करतात, परंतु गट-ड च्या प्रतिक्षासूचीवरील

नाव गट-क च्या प्रतिक्षासूचीत घेण्याची तरतूद प्रचलित धोरणात नसल्याने त्य अनुकंपाधारकाचे नाव गट-क च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करता येत नाही. यास्तव गट-ड मधून गट-क प्रतिक्षासूचीत नाव अंतर्भूत करण्याबाबत तरतूद करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

आ) प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणामध्ये केवळ लिपिक-टंकलेखक या पदासाठी अनुकंपा नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. मात्र गट-क मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाव्यतिरिक्त अन्य असे काही संवर्ग आहेत की ज्यांना सेवाप्रवेश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे. अशा संवर्गातील पदांवर

१) गट-ड च्या प्रतिक्षासूचीतून गट-क च्या प्रतिक्षासूचीत नाव वर्ग करणेबाबत :- गट-ड च्या प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराने गट-ड च्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यापूर्वी जर गट-क पदासाठी आवश्यक असणारी वाढीव शैक्षणिक अर्हता प्राप्त केली व त्यानुसार त्याने गट-क च्या प्रतिक्षासूचीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केल्यास, त्याचे नाव गट- ड च्या प्रतिक्षासूचीतून वगळून गट-क च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करावे. यासाठी गट-ड च्या प्रतिक्षासूचीतील उमेदवार गट-क साठीची शैक्षणिक अर्हता धारण केल्याच्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह परिपूर्ण अर्ज ज्या दिनांकास नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे करेल त्या दिनांकास त्याचे नाव गट-क च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्यात यावे व गट-ड च्या प्रतिक्षासूचीतून त्याचे नाव वगळण्यात यावे. तसेच त्यानुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्हास्तरीय गट-ड च्या सामायिक प्रतिक्षासूचीतून सदर उमेदवाराचे नाव वगळून ते जिल्हास्तरीय गट – क च्या सामायिक प्रतिक्षासूचीत उमेदवाराने गट-क पदाची शैक्षणिक अर्हता प्राप्त करुन नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे गट बदलण्यासाठी केलेल्या अर्जाच्या दिनांकास समाविष्ट करण्याबाबत कळवावे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तशी कार्यवाही करावी. एकदा गट-ड च्या प्रतिक्षासूचीमधून नाव वगळून गट-क च्या प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट केल्यास पुन्हा गट-ड च्या प्रतिक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही.

यापूर्वी अनुकंपाधारकाने जरी गट बदलण्याची विनंती केली असली तरी तत्कालीन नियमांत तशी तरतूद नसल्याने अनुकंपाधारकांनी गट बदलण्यासाठी पुन्हा नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करावा. असा अर्ज या शासन निर्णयाच्या दिनांकापासून किंवा त्यानंतर ज्या दिनांकास अर्ज प्राप्त झाला असेल त्या दिनांकास अनुकंपाधारकाचे नाव प्रतिक्षासूचीतून बदलता येईल.

२) गट-क च्या ज्या ज्या पदांसाठी टंकलेखनाची तांत्रिक अर्हता आवश्यक आहे अशा पदांवर अनुकंपा नियुक्तीबाबतची कार्यवाही :- गट-क मधील लिपिक टंकलेखक या संवर्गातील

पदावर अनुकंपा नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे. गट-क मधील लिपिक टंकलेखक या संवर्गाव्यतिरिक्त इतर गट-क च्या ज्या अन्य संवर्गांना सेवाप्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे ही अर्हता नमूद करण्यात आली आहे, अशा गट-क संवर्गातील अनुकंपा नियुक्ती धारकांना अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार टंकलेखन अर्हतेबाबतचे वेळोवेळी केलेले नियम लागू राहतील.

३) बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबत:- बेपत्ता झालेला शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय ठरेल. बेपत्ता कर्मचाऱ्याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत ही अनुकंपा धोरणासाठी वेळोवेळी केलेल्या नियमानुसार लागू राहील.

 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०९१९१८०१०१९००७ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.