MSME चॅम्पियन्स योजनेअंतर्गत स्पर्धात्मक ( लीन) योजना…
ही योजना, एमएसएमई क्षेत्रात लीन उत्पादक पद्धतींबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देत लीन श्रेणी गाठण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहन देण्यासाठीची एक व्यापक मोहीम आहे. या योजनेंतर्गत, एमएसएमई, 55, कैजर, कांबन, व्हिज्युअल वर्कप्लेस, पोका वोका अशी लीन उत्पादक साधने, प्रशिक्षित आणि सक्षम लीन सल्लागारांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मूलभूत, मध्यम आणि उच्च यासारख्या लीनमधल्या श्रेणीपर्यंत पोहोचतील. लीनच्या मदतीमुळे, एमएसएमई उद्योगातील नासाडी कमी होऊ शकेल, उत्पादकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढेल आणि हे उद्योग स्पर्धात्मक होऊन फायद्यात चालू शकतील.
एमएसएमई क्षेत्राला आधार देण्यासाठी, या लीनच्या अंमलबजावणी तसेच सल्ला यातील 90 टक्के खर्च सरकार वहन करेल. तसेच जे एमएसएमई उद्योग स्फूर्ती (SFURTI) समूहाचा भाग असतील म्हणजे, महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि ईशान्य भारतात सुरु असलेले उद्योग असतील, अशा उद्योगांसाठी सरकार आणखी 5 टक्के योगदान देईल. या सगळ्या सोबत, उद्योग संघटना समग्र उपकरण उत्पादन संस्था
(OEM) यांच्याद्वारे नोंदणी करण्याऱ्या उद्योगांना, सर्व श्रेणी पूर्ण केल्यानंतर आणखी 5 टक्के मदत सरकारकडून मिळेल. उद्योग संघटना आणि ओईएम यांना पुरवठा साखळी विक्रेत्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, हे एक विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.
एमएसएमई युनिट्ससाठी आर्थिक सहाय्य:-
एमएसएमईसाठी सल्लागार शुल्काच्या अंमलबजावणी खर्चावर 90% सबसिडी. सर्व स्तर पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्री असोसिएशन / ओईएम द्वारे नोंदणी करणाऱ्या एमएसएमईला अतिरिक्त 5% योगदान दिले जाईल.
• लीन हस्तक्षेपाचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर 5000/ प्रति एमएसएमई oem/ असोसिएशनला दिले जातील.
Msme अर्जाची लिंक 👇
https://lean.msme.gov.in/VerifyUdyam/Register