Take a fresh look at your lifestyle.

भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “ घर घर संविधान” कार्यक्रम साजराकरणेबाबत शासन निर्णय जारी….

0

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्येजागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४ – २५ “ घर घर संविधान” साजरा करण्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे:-

२. शिक्षण:- संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे.

३. मूल्यसंस्कारः- भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे,ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.

४. सक्रिय सहभाग:- विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणिराजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी

प्रेरित करणे.

 

५. राष्ट्रीय एकात्मता:- व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे,ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा ववसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.