“अव्वल कारकून” गट-क कर्मचाऱ्यांची “अव्वल कारकून” ऐवजी “सहाय्यक महसुल अधिकारी” असे पदनाम करण्याचा शासन निर्णय जाहीर….
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील “अव्वल कारकून” गट-क कर्मचाऱ्यांची “अव्वल कारकून” ऐवजी “सहाय्यक महसुल
अधिकारी” असे पदनाम करण्याची मागणी, अव्वल कारकून या पदाची वेतनश्रेणी ६ व्या वेतन आयोगानुसार – वेतनबँड रू.५२००-२०२००, ग्रेड पे रू.३५००/- अशी असून, ७ व्या वेतन आयोगानुसार- वेतनबँड एस-१२ रू.३२०००-१०१६०० इतके आहे. सदर पदनामामध्ये बदल केल्यामुळे कोणतीही वेगळी वेतनश्रेणी वा वेतनवाढ देय होणार नाही व वेतनामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे शासनावर कोणताही वित्तीय भार पडणार नाही किंवा त्यांच्या सेवा विषयक बाबींमध्येही कोणताही बदल होणार नाही या अधिन मान्य करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार खालील अटीच्या अधिन राहून महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील “अव्वल कारकून” पदाचे पदनाम “ सहाय्यक महसुल अधिकारी” असे करण्यात येत आहे.
अ) वरीलप्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.
ब) सातव्या वेतन आयोगानुसार महसुल विभागांतर्गत अव्वल कारकून, गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली एस-१२ (S-१२ : रू.३२०००-१०१६००) ही वेतनश्रेणी पदनाम बदलानंतर “सहाय्यक महसुल अधिकारी” यांना लागू राहील. या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळ्याने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारांत घेतली जाणार नाही.
क) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारांत घेतली जाणार नाही.
ड) महसूल विभागांतर्गत “अव्वल कारकून” गट-क संवर्गाचे पदनाम “सहाय्यक महसुल अधिकारी” असे बदलानंतर अन्य संवर्गातील “सहायक अधिकारी” पदासाठी असणारी वेतनश्रेणी / वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही.