Take a fresh look at your lifestyle.

महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्याचा शासन निर्णय जाहीर….

0

महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्यास पुढील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.:-

(१) वरीलप्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच, पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी/ वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही.

(२) सातव्या वेतन आयोगानुसार “तलाठी” या पदाची वेतनश्रेणी एस ८, रू.२५५००-८११००/- अशी आहे. तलाठी या पदनामामध्ये बदल केल्यामुळे या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळयाने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही.

(३) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१४१५५७४६३९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.