Take a fresh look at your lifestyle.

राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी आर्थिक विकास महाराणा प्रताप महामंडळ स्थापन ; शासन निर्णय जारी…

0

राजपूत समाजामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याच बरोबरीने लघु उद्योग, वाहतूक, अन्य

 

व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन आर्थिक स्तर उंचावणे, यासाठी दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.

त्यानुसार कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आली आहे.