Take a fresh look at your lifestyle.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘या’ 4 ठिकाणी करा गुंतवणूक व शासकीय योजना…

0

जर तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. हे जाणुन घ्या की सध्या सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहे ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करु शकतात.

SIP – म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी तुम्ही SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा अवलंब करू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय असू शकतो. तुम्ही हे फक्त 100 रुपये दरमहा करू शकता. तुम्ही यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तुम्हाला एसआयपीमध्ये चक्रवाढ लाभ देखील मिळतात, जरी ते बाजाराशी जोडलेले असल्यामुळे हमी परतावा देऊ शकत नाही. परंतु 12-14 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.

आवर्ती ठेव योजना – पोस्ट ऑफिसची आरडी म्हणजेच आवर्ती ठेव योजना, या योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये 45 वर्षांसाठी खाते उघडता येते. त्यावर सुमारे 6 टक्के व्याज मिळते. हे व्याज फक्त तिमाही आधारावर उपलब्ध आहे. 2,000 रुपये देऊनही खाते उघडता येते. तुम्ही 5 वर्षात 1 लाख 20 हजार रुपये गुंतवाल. तुमची इच्छा असल्यास, 3 वर्षांनंतर, तुम्ही खात्यात जमा केलेले पैसे वेळेपूर्वी काढू शकता.

PPF वर चांगला परतावा – मुलांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 7.1 टक्के परतावा मिळतो. तुम्ही यामध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम 80-सी अंतर्गत सूट मिळते. यामध्ये गरज पडल्यास काही रक्कमही काढता येते.

LIC योजना घेऊ शकतात– एलआयसीच्या अनेक योजना आहेत ज्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी घेतल्या जाऊ शकतात. यासाठी कोणतेही विहित वय नाही. LIC ची जीवन तरुण पॉलिसी ही एक नॉन लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. यामध्ये मुलांना विमा संरक्षण आणि बचत योजना या दोन्ही सुविधा मिळतात. मुलांचे शिक्षण- त्यांचे भविष्य उंचावण्यासाठी त्यात गुंतवणूक करू शकतात. अशा इतर अनेक योजना आहेत.

सुकन्या समृद्धी योजना – योजना अल्पबचत योजनेंतर्गत ठेवण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत पालकांच्यावतीने गुंतवणूक केली जाते. सरकार सध्या या योजनेवर 7.6 टक्के परतावा देत आहे आणि या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत जन्मापासून १८ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.

बालिका समृद्धी योजना – ही योजनादेखील सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे, या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते, या योजनेत केलेली गुंतवणवूक मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच काढता येते.

CBSE उडान स्कीम – उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रदान करते. यासह या योजनेत मुलींना अभ्यासाचे साहित्यासह प्रीलोडेड टॅब्लेटदेखील दिले जातात.

मुख्यमंत्री लाडली योजना – झारखंड राज्याने मुख्यमंत्री लाडली योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात पाच वर्षांसाठी 6000 रुपये जमा केले जातात.

माझी कन्या भाग्यश्री- महाराष्ट्र शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. तसेच दोघींनाही 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

बेटी बचावो बेटी पढावो- पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे). मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे आणि मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.