Take a fresh look at your lifestyle.

दूध अनुदान योजना….

0

दूध भुकटी व बटरचे दर कोसळलेले असल्याने दुधाच्या भावात झालेली घसरण तसेच दूध अनुदान योजना पुनश्चः सुरू करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी विचारात घेऊन दि. २८.६.२०२४ रोजी अतिरक्त अर्थसंकल्प सादर करतेवेळी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दि. १ जुलै, २०२४ पासून रू. ५/- अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच दि. १.७.२०२४ रोजी मा. मंत्री (दुग्धव्यवसाय ) यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुषंगाने, दि. २.७.२०२४ रोजी सभागृहात मा. मंत्री (दुग्धव्यवसाय) यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केले त्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने, यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून रू. ३०/- प्रतिकिलो अनुदान देण्याची घोषणा केली होती.

सदर घोषणांच्या अनुषंगाने दि. ५.७.२०२४ रोजी मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तसेच दि. १२.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीतील मान्यतेने दि. १२.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दूध भुकटी रूपांतरणास ही प्रती लीटर रू. १.५०/- इतके अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली होती.