Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये मिळणार कायमस्वरूपी आरक्षण…

0

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत.

साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल.

याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून यांना चढ- उतार करताना प्राधान्य दयावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेली आहेत.