Take a fresh look at your lifestyle.

कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ….

0

शासन निर्णयान्वये “सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना” या योजनेंतर्गत नवविवाहित दांपत्यांना अनुदान म्हणून रु.२०,०००/- इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून रु. ४,०००/- देण्यात येत आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि. २० मे, २०२३ रोजी पालघर येथील सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान, सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या दांपत्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात रु.२५,०००/- पर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागांतर्गत “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना” अंतर्गत नवविवाहित दांपत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रु.२५,०००/- व सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना रु. २,५००/- एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास दि. १३ मार्च, २०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

“सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना” या योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

(क) सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या रु.२०,०००/- (रु. वीस हजार फक्त) इतके अनुदान वधुचे वडील, आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे देण्यात येते.