नवतरुणांना सुवर्णसंधी; जळगांव होमगार्ड भरती जाहीर….
देशातील जास्तीजास्त नागरीकांना सैनिकी, तसेच आपतकालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देवून जबाबदार व शिस्तप्रिय नागरीक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे.
होमगार्ड सदस्य नोंदणीकरीता उमेदवारांसाठी मर्गदर्शक सूचना
1. होमगार्ड सदस्यत्व : महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार हमी नाही. हे सदस्यत्व तीन वर्षाकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुर्णनोंदणीकृत करता येते.
2. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त्कर्तव्य, आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात.
3. होमगार्ड देय भत्ते : होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो.
4. शास्ती : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या / कर्तव्यामध्ये कसून करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7 ( 1 ) अन्वये बडतर्फ किंवा रु. 250/- इतका दंड/तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.
5. होमगार्ड नोंदणी : होमगार्ड नोंदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्वा करीता कोणत्याही इतर मार्गाचा ( वशिला किंवा लाच) अवलंब करु नये या करीता कोणीही लाच/पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, जळगांव किंवा मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक जळगांव यांचेशी संपर्क साधावा.
6. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :
1. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क् सैनिकी प्रशिक्षण.
2. 3 वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलिस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण.
3. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
4. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार / पदके मिळविण्याची संधी.
5. स्वत:चा व्यवसाय / शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी. होमगार्ड नोंदणी नियम व अटी (होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पात्रतेचे निकष )
1) शैक्षणिक अर्हता कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण (SSC) असावा.
2) शारिरीक पात्राता (दि. 31/07/2024 रोजी )
वय – 20 ते 50 वर्षे होमगार्ड नोंदणीसाठी (दि. 31/07/1974 नंतर ते दि. 31/07/2004 पुर्वी) उंची
– पुरुष उमेदवारासाठी उंची 162 से.मी. व महिला उमेदवारासाठी 150 से.मी.
छाती – (फक्त् पुरुष उमेदवारांकरीता ) ( न फुगविता किमा 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक)
अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही.
3) आवश्यक कागदपत्र
1- रहीवासाचा पुरावा मतदान ओळखपत्र, आधारकार्ड.
2- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.
3- जन्म दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
4- तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम् प्रमाणपत्र.
5- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
6- 3 महिन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना
1. होमगार्ड नोंदणी अर्ज दि. 25/07/2024 ते 14/08/2024
https://maharashtracdhg.gov.in enrollmentform.php या कालावधीमध्ये या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरतांना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे.
उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमाक च्या रहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
2. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
3. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेल्या सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला
वर्तमानातील एक फोटो चिटकवावा. मराठी मधील नाव उमदवारानी स्वतः पेनाने लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरु नये.
4. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत दि. 14/08/2024 सायं. 05:00 वाजेपर्यंत राहील. सर्व
अर्जांची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरीक क्षमता चाचणी करीता तारीख नंतर जाहीर करणेत येईल.