Take a fresh look at your lifestyle.

गौरी-गणपती उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ मिळणार; शासन निर्णय जारी

0

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा,चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच दि. १५ ऑगस्ट,२०२४ ते दि. १५ सप्टेंबर, २०२४ या १ महिन्याच्या कालावधीत ई- पॉस प्रणालीद्वारे ₹१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

उपरोक्त “आनंदाचा शिधा ” वितरीत करण्याकरीता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी Mahatenders या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांऐवजी ०८ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.