Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज करण्यास अजून २ दिवसांची मुदतवाढ…

0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर २ शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची २ शिक्षण फी, परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता दि. 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येऊ शकणार आहे.

सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि अनुसूचित प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अनुसूचित प्रवर्गाकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.