‘या’ प्रकारे तिकीट काढल्यास मिळणार 3 टक्के बोनस; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय…
देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच आता रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे आरक्षण तिकीट ज्याप्रमाणे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन काढता येते, त्याचप्रमाणे साधारण तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास देखील घरी बसून काढता येणार आहे.
रेल्वे विभागाने यासाठी असणारी पाच किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. यूटीएस अॅपवरुन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच या पद्धतीने तिकीट काढल्यास तीन टक्के बोनस देखील मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने मोबाइल अॅप्लिकेशन यू.टी.एस.वरुन सुविधा दिली आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरुन यू.टी.एस. डाऊनलोड करावे लागले. त्यानंतर त्याच्यावर लॉगीन केल्यावर तुम्हाला कधीही जनरल तिकीट, पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे.
हे तिकीट काढण्यासाठी 3 टक्के बोनस देण्यात येणार आहे. तसेच या अॅपमुळे पी.एन.आर. स्टेट्स, हॉटल बुकिंग, ट्रेनचे रनिंग स्टेट्स, सीट उपलब्धता, आलटरनेटिव्ह ट्रेन ही माहिती मिळणार आहे.